‘शिक्षणगंगा : फिनलंडमधून आपल्या दारी’ – फिनलंड शिक्षणपद्धती आणि भारतीय शिक्षणपद्धती यांच्याविषयी तुलनात्मक विचार मांडणारं मराठी भाषेतील पहिलंवहिलं पुस्तक
या पुस्तकात फिनलंडच्या शिक्षणपद्धतीची तोंडओळख व इतिहास आणि तेथील बालशिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण, शाळांमधील काही रंजक गोष्टी, प्राथमिक शिक्षणात उच्चशिक्षणाची तयारी, परीक्षापद्धती यावर भर दिला आहे. शिक्षकांचं कितीही प्रशिक्षण झालं आणि त्यांना कितीही मार्गदर्शन मिळालं, तरी संदर्भसाहित्याची गरज असतेच, काही यशोगाथा समोर असणं गरजेचं असतं, ती उणीव हे पुस्तक भरून काढतं
.......